रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे यांची नागरीकांसाठी अहोरात्र सेवा

0

रावेर (शालिक महाजन) : कोरोना सारख्या जीवघेण्या व्हायरसपासून बचावासाठी देशभरात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आला असून संचारबंदीदेखील सुरू आहे. रावेर शहासह ग्रामीण भागातदेखील महसूल प्रशासनाकडून घरातच राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत तर नोकरी करणार्‍या महिला गृहिणी आपल्या कुटुंबा सोबत घरात सुरक्षित वेळ घालवत आहे परंतु यास रावेरच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार उषाराणी देवगुणे अपवाद ठरल्या आहेत. एका मुलाच्या आईसोबत त्या तालुक्याच्या तहसीलदार असल्याने अहोरात्र नागरीकांसाठी त्या झटत आहेत. शहरासह तालुक्यात त्यांचे अहोरात्र काम सुरू असून नागरीकांना मास्क वापरण्यासह घरातच राहण्याचे आवाहन तर त्या करीतच आहे शिवाय नागरीकांना जीवनावश्यक वस्तू, स्वस्त धान्य मिळत आहे वा नाही याचीदेखील गावो-गावी जावून खातरजमा करीत आहेत. रावेर तालुका सुरक्षित ठेवण्यासाठी त्या कोरोनाशी एका सैनिका प्रमाणे लढत आहेत.

अधिकारी नव्हे ‘त्या’ तर योद्धाच
कोरोनापासून बचावासाठी सर्वत्र लॉकडाऊन सुरू असून लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी एका युध्दाप्रमाणे महसूल प्रशासन, पोलिस प्रशासन, आरोग्य प्रशासन लढत आहे. यामध्ये महिला तहसीलदार उषाराणी देवगुणे यांची लोकांना कोरोनापासून सुरक्षित ठेवण्याची धडपड अतुलनीय आहे. एक कर्तव्य दक्ष आई आणि तालुक्याच्या तहसीलदार असलेल्या उषाराणी देवगुणेंची पहाट त्यांच्या मुलगा वर्धनच्या प्रश्नापासून सुरू होते. मम्मी आज केव्हा येणार ? याच उत्तर देतांना देवगुणे यांची रोज चांगलीच दमछाप होते. तहसीलदार यांचे पती नितीन दहिकर हे दिवसभर मुलांची आई घरी येईल तोपर्यंत सांभाळ करतात. सकाळी दहा वाजेपासून भर उन्हात देवगुणे तालुक्यातील गावो-गावी फिरतात तसेच स्वत: लोकांना माईकद्वारे घरात रहा, सुरक्षित रहा, मास्कर बांधण्याच्या सूचना करतात गावात जातांना एखाद्या शेतात कामाच्या शोधात आलेले कुटुंब दिसले की गाडी थांबवुन गाडीत ठेवलेले धान्याचे किट्स त्या गरीब कुटुंबाना देतात परंतु गावातून त्यांची गाडी गेली म्हणजे ‘स्थिती जैसे-थे’ सारखी होते. अनेक लोक घराबाहेर येऊन गप्पा मारतात, त्यांना कोरोनाचे गांभीर्य दिसत नाही तर इकडे तहसीलदार दुपारी एकच्या दरम्यान तहसील कार्यालयात येऊन लोकांच्या प्रलंबित समस्या तसेच धान्य तसेच अन्य समस्या सोडवतात. गरीब कुटुंबापर्यंत धान्य पोहचविण्यासाठी स्वत : लक्ष ठेवूण असतात. गरीब जनतेच्या जेवणाची व्यवस्था करता-करता स्वता:च्या जेवनणचे सुध्दा भान त्या विसरून जातात. एकीकडे कोरोनाच्या भीतीपोटी अनेक महिला आपल्या मुलांसोबत घरातच राहणे पसंत करतात परंतु याला वर्धनची कर्तव्य दक्ष आई उषाराणी देवगुणे अपवाद आहे. त्या संकटकालीन स्थितीत लोकांसाठी कोरोनाशी एका योध्दा सारख्या लढत असून रोज सायंकाळी घरी जातांना त्यांना वर्धनच्या प्रश्नाचे उत्तर आपल्या सोबत घेऊन घरामध्ये जावे लागते.