रावेर तालुका अ‍ॅग्रो असोसिएशनतर्फे तहसीलदारांना निवेदन

0

रावेर : शहरासह तालुक्यातील कृषी विक्रेत्यांना येत्या खरीप हंगामात बियाणे, कीटक नाशके व रासायनिक खतांच्या साठा नोंद तसेच विक्रीसाठी लागणार्‍या विक्री बिलबुक व साठा रजिस्टर मिळत नसल्याने नोंदीची समस्या निर्माण झाली असल्याने व संचारबंदीमुळे प्रिंटिंग ऑफसेट बंद असल्याने रजिस्टर व इतर छपाई कामे बंद आहेत मात्र खरीप हंगाम तोंडावर असल्याने त्या दृष्टीने तयारीसाठी व साथ नोंदवही प्रमाणित करण्यासाठी साठा रजिस्टर व विक्री बिलबुके मिळण्यास अडचणी येत आहेत त्या अनुषंगाने याबाबत रावेर तहसील कार्यालयात तहसीलदार उषाराणी देवगुणे यांना रावेर अ‍ॅग्रो डिलर्स असोसिएशनतर्फे या समस्येवर तोडगा काढण्यासाठी निवेदन देण्यात आले.

यांची होती उपस्थिती
यावेळी अ‍ॅग्रेा डिलर्स असोसिएशनचे तालुकाध्यक्ष सुनील कोंडे, शहराध्यक्ष एकनाथ महाजन, सचिव युवराज महाजन, कृषी विक्रेते चंद्रकांत अग्रवाल आदी उपस्थित होते.

साठा प्रमाणिकरणासाठी साठा रजिस्टर गरजेचे
खरीप हंगामाच्या दृष्टीने बियाणे लवकरच बाजारात उपलब्ध होणार असून कृषी विभागाकडून साठ्याच्या प्रमाणिकरणासाठी साठा रजिस्टर गरजेचे आहे मात्र ऑफसेट, व छपाई बंद असल्याने अडचणी येत आहेत याबाबत प्रशासनाने तोडगा काढण्यासाठी तालुका संघटनेतर्फे निवेदन देण्यात आल्याचे रावेर तालुका अ‍ॅग्रो डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुनील कोंडे म्हणाले.