रावेर तालुका : 48 तासात वाढले तब्बल 126 कोरोना रुग्ण
परीस्थिती नियंत्रणासाठी गटविकास अधिकारी अधिकारी दीपाली कोतवाल उतरल्या रस्त्यावर ः रुग्णवाढीने चिंता
रावेर (शालिक महाजन) : रावेर शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता खबरदारी व उपाय-योजनेच्या पाहणीसाठी तहसीलदार उषाराणी देवगुणे व गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांनी संयुक्त पाहणी केली व जनतेनेला काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. रावेर तालुक्यात सध्या तीन हजार 300 कोरोना पेशंट बाधीत आहे तर 112 जणांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यु झाला आहे.मागील 48 तासात 126 कोरोना बाधीत झाले असून एकाचा मृत्यु झाला आहे. शिंगाडी व तांदलवाडीत हॉटस्पॉट कायम आहे गटविकास गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांनी स्वतत् पाहणी केली व कंन्टमेंटझोनला देखील भेट देत कोरोना नियंत्रणाचा आढावा घेतला.
खिर्डी, निंभोरा, दसनुर भागाची पाहणी
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता प्रशासकीय टिमने गुरुवारी शिंगाडी, खिर्डी खुर्द, खिर्डी बु.॥, निंभोरा, दसनुर आदी भागांची पाहणी केली व कंन्टेमेंट झोनला देखिल भेट दिल्या सोबत गावस्तरावर कोरोना समितीला गावात जन-जागृती करण्याच्या सूचना दिल्या. विना मास्क फिरणार्यांकडून दंड घेण्याच्या सूचना करण्यात आल्या सोबत नागरीकांनी अँटीजन टेस्ट करण्याच्या सूचना दिल्या
खबरदारी घेणे हाच एकमेव उपाय : बीडीओ
सध्या कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव बघता खबरदारी घेणे हाच एकमेव उपाय आहे. हॉटस्पॉट असलेल्या गावांतील जनतेने स्वतःहून तपासणी करून घ्यावी. कोरोनाची ही दूसरी लाट असून पुढील काही महीने अत्यंत महत्वाचे आहे. खबरदारी घेणे हाच एकमेव उपाय असल्याचा सल्ला गट विकास अधिकारी दीपाली कोतवाल यांनी ग्रामस्थांना दिला आहे.