रावेर तालुक्यातील पुर्नवसित गावांसाठी सव्वा कोटीच्या कामांना मंजुरी

0

मुक्ताईनगर- माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्या प्रयत्नांनी हतनूर प्रकल्पांतर्गत मुक्ताईनगर व रावेर तालुक्यातील मेंढोदे व अजनाड पुनर्वसित गावांसाठी 1.25 कोटी रुपयांच्या नागरी विकासकामांना मंजुरी मिळाली आहे. खडसे यांनी मुक्ताईनगर व रावेर तालुक्यातील पुनर्वसित गावांना नागरी सुविधा सुविधा पुरवण्यासंदर्भत धोरणात्मक निर्णय घ्यावेत याबाबत प्रशासकीय अधिकार्‍यांशी वेळोवेळी दूरध्वनीवरून चर्चा केली तसेच शासनाकडे पत्रव्यवहार व चर्चा करून पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभाग वनविभाग 24 जुलैच्या 2018 च्या शासन निर्णयानुसार हानुर प्रकल्पांतर्गत जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर व रावेर तालुक्यातील मेंढोदे व अजनाड पुनर्वसित गावठाणमधील नागरी सुविधांच्या एकूण सव्वा कोटींच्या कामांना मंजुरी प्रदान करण्यात आली. मेंढोदे हे हे गाव हतनूर प्रकल्पामुळे बाधीत असून गेल्या 30 वर्षांपासून या गावतील पुनर्वसनाची कामे आजतागायत पूर्ण झाली नसल्याने पुराच्या पाण्यामुळे या गावातील दळण-वळणासाठी असलेले रस्ते पूर परीस्थितीत पाण्याखाली जातात शिवाय हतनूर प्रकल्पातील क्षेत्रांमधील पुराच्या पाण्यामुळे बाधित होणार्‍या गावात शेत रस्ते, पूल करून देण्याबाबत वारंवार बाधीत ग्रामस्थांकडून मागणी करण्यात येत होती. याची दखल माजी मंत्री खडसे यांनी घेतली तर यााठ तब्बल 25 कोटींचा निधी प्राप्त झाला असून लवकरच कामांना सुरूवात करण्यात येणार असल्याचे माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांचे स्वीय सहाय्यक योगेश कोलते म्हणाले.

या कामांना मिळाली मंजुरी
मेंढोदे येथील समाज मंदिरासाठी दहा लाख, शाळा संरक्षक भिंत 20.50 लाख तसेच अंतर्गत रस्त्यांसाठी 61 लाख व उघड्या गटारींसाठी 29 लाख रुपये मंजूर झाले आहेत. सर्व कामे ही मेंढोदे गावात होणार असून रावेर तालुक्यातील अजनाड येथील पंपगृहाच्या मजबुतीकरण चार लाख रुपये मंजूर झाले आहेत.