रावेर तालुक्यातील प्रौढाचा दुचाकी अपघातात मृत्यू

रावेर :  दारूच्या नशेत दुचाकी चालवल्यानंतर ती स्लीप झाल्याने तालुक्यातील धूरखेडा येथील ध्यानसिंग गुमानसिंग बारेला (40, धूरखेडा, ता.रावेर) यांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार, 8 रोजी रात्री साडेसात वाजेपूर्वी घडली. या प्रकरणी सुनील भाईसिंग बारेला (रूंदा, ता.झिरण्या) यांच्या फिर्यादीवरून ध्यानसिंग बारेला यांच्याविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी रात्री ध्यानसिंग यांनी मद्यप्राशन केल्यानंतर दुचाकी (एम.एच.19 एस.3577) ही चालवल्यानंतर अपघात होवून त्यांचा मृत्यू ओढवला. स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक सचिन नवले करीत आहेत.