रावेर तालुक्यातील मोहगन परिसरात बिबट्याच्या मुक्तसंचारामुळे दहशत

1

रावेर । तालुक्यातील मोहगन या आदिवासी घनदाट परिसरातील गंगापुरी धरणाच्या जवळ काही जनांनी बिबट्या बघितल्याचे समजते त्यामुळे मोहगनसह इतर ठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उन्हाळा वाढत असल्याने पाणी अथवा ठंड जागेच्या शोधात हिंस्र प्राणी धरण, विहीर, अथवा गावाच्या दिशेने येतात. त्यात शेतात किंवा जंगलात गेलेले मजुरानां बिबट्या धरणाच्या दिशेने जातांना दिसला त्याच क्षणी तेथील मजूर उलटेपाय गावाकड़े परत आल्याचे समजते.

याबाबत वनविभागाशी संपर्क साधला असता त्यांनी बिबट्याच्या संचाराला दुजोरा दिला खरा पण फिरणारा प्राणी बिबट्या नसून तळस असल्याचे सांगण्यात आले, यामुळे परिसरात सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या आधी बिबट्याने जिन्सी परिसरातीत अति दुर्गम जंगालात काही महिन्यांपूर्वी एका गाईचा फाडश्या पाडला होता आणि आता गंगापूरी धरणानजीक बिबट्याचा संचार काही लोकांनी पाहिल्याने गाईचा फाडश्या पडणारा हाच तो बिबट्या असावा असा अंदाज आहे.