रावेर तालुक्यातील 13 गावातील कोतवाल भरतीसाठी आरक्षण जाहीर

0

रावेर- तालुक्यातील कोतवाल भरतीसाठी मंगळवारी सकाळी तहसील कार्यालयात तहसीलदार विजयकुमार ढगे यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडण्यात आली. सकाळी 11 वाजता मनीष जगदीश बारेला या नऊ वर्षीय बालकाच्या हस्ते आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या.

गावनिहाय आरक्षण असे- विवरे खुर्द- सर्वसाधारण महिला, निंबोल- खुला, विवरे बु.॥- इतर मागास वर्ग, मस्कावद- खुला, दसनुर- खुला, शिंगाडी- खुला, ऐनपूर- सर्वसाधारण महिला, सावदा- माजी सैनिकांसाठी राखीव, रावेर- खुला, खिरवड- भटक्या जमाती क, खानापूर- भटकया जमाती ड, थेरोळे भटक्या जमाती ब, सावखेडा बु.॥- विमुक्त जमाती अ. दरम्यान, आदिवासी भागात पेसा करीत तीन जागा आरक्षित करण्यात आल्या. त्यात मोहमांडली, प्रिंपी, पाल अ.ज करीता राखीव ठेवण्यात आले आहे. यावेळी राहुल तायडे, एस.ए.जैस्वाल, कुळ कायद्याचे एस.एस.शिरनाथ, शेखावत तडवी यांच्यासह मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते.