रावेर तालुक्यातील 265 शेतकर्‍यांकडील ज्वारीसह मक्याची खरेदी

0

एक कोटी 59 लाखांची रक्कम अदा ; खरेदी-विक्री संघाने केली शासकीय भावात खरेदी

रावेर- तालुक्यातील ऑनलाईन नोंदणी केलेल्या 265 शेतकर्‍यांची दोन कोटी आठ लाख 93 हजार 380 रुपयांची ज्वारी व मका खरेदी करण्यात आली आहे. यामध्ये ज्वारी एक कोटी 84 लाख नऊ हजार 680 तर 24 लाख 83 हजार 700 रुपयांचा मका खरेदी करण्यात आला. गतवर्षाच्या तुलनेत मक्याची खरेदी कमी प्रमाणात झाली असून ज्वारीची खरेदी अपेक्षेपेक्षा जास्त शेतकर्‍यांनी शासकीय भावात विक्री केली. त्यात सात हजार 576 क्विंटल ज्वारी तर एक हजार 461 क्विंटल मक्याची खरेदी करण्यात आली. 31 डिसेंबर 2018 अखेर पर्यंत खरेदी झालेल्या ज्वारी व मक्याचे एक कोटी 59 लाख 48 हजार 330 रुपये शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले. 1 जानेवारीनंतर खरेदी केलेल्या ज्वारीचे 49 लाख 45 हजार 50 अजून येणे बाकी आहे. ज्वारी व मक्याची खरेदीसाठी खरेदी-विक्री संघाचे मॅनेजर विनोद चौधरी, ग्रेडर प्रशांत पाटील यांनी शेतकर्‍यांना सहकार्य केले.