रावेर तालुक्यातील 60 गावे स्वच्छ व हगणदारी मुक्त

0

तालुक्यातील मान्यवरांच्या उपस्थितीत केला गौरव

रावेर :- ग्रामविकास व जलसंधारणच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागा तर्फे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत करण्यासाठी तालुकाभरातील गावांनी सक्रीय सहभाग घेतला होता त्यापैकी 60 गावे स्वच्छ व हगणदारी मुक्त झाल्याने आज पंचायत समितीत सरपंच व ग्रामसेवकांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

याबाबत वृत्त असे की येथील पंचायत समितीच्या हॉल मध्ये स्वच्छ भारत मिशनचा कार्यक्रम पार पडला यावेळी झेडपी उपध्यक्ष नंदकिशोर महाजन, सभापती सौ माधुरी नेमाळे,उपसभपती सौ अनिता चौधरी, जि प सदस्या सौ रंजना पाटील,बीडीओ डॉ सानिया नाकाडे,प स सदस्य जुम्मा तडवी,योगेश पाटील, योगिता वानखेड़े,रुपाली कोळी,दीपक पाटील,जितु पाटील,सरपंच श्रीकांत महाजन,प्रल्हाद पाटील, महेश चौधरी,सरपंच सुनील पाटील,यांच्या सह मोठ्या संखेने सरपंच व ग्राम सेवक उपस्थित उपस्थित होते सत्ताधारी भाजपाचे प स सदस्य पि के महाजन,धनश्री सावळे यांची यावेळी अनउपस्थिती होती .

हगणदारीमुक्तसाठी यांनी घेतले परिश्रम
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत तालुकाभरातील गावांकडून स्वच्छतेसाठी काम करून घेण्यासाठी पंचायत समितीतील विस्तार अधिकारी डी एच सोनवणे, सि आर महाले श्री तडवी स्वच्छ भारत मिशन कक्षाचे समाधन निंभोरे, मंजुश्री पवार,चंदा सुरदास, भीमराव तायडे,भिमराव सुरदास कक्षधिकारी सुनिल सूर्यवंशी आदिंनी योजनेवर खुप परिश्रम घेतले

सरपंचासह ग्राम सेवकांचा झाला सत्कार
यावेळी तालुक्यातील सरपंच खिरोदा सुनील पाटील, के-हाळे विशाल पाटील, अटवाडे गणेश महाजन,यांच्या सह 60 ग्राम पंचायतीच्या सरपंच ग्राम सेवकांचा प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.