रावेर तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी

0

रावेर:- तालुक्यातील पाल, मोरव्हाल, सहस्त्रलिंग, गुलाबवाडी परीसरात रविवारी दुपारी जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे कोणत्याही पिकाचे नुकसान झाले नसलेतरी उकाड्याने त्रस्त असलेल्या जनतेला मात्र काहीसा दिलासा मिळाला आहे. रावेर परीसरातील सातपुड्यातील आदिवासी पट्ट्यात रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास् अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. आधीच तापमानाचा पारा वाढला असताना अंगाची लाही लाही होत असताना अचानक अवकाळी आलेल्या पावसाने तापमान कमी झाल्याने नागरीकांना काहीसा दिलासा मिळाला.