सात ठिकाणी महिलांनी तर तीन ठिकाणी पुरुषांना संधी
रावेर: तालुक्यातील दहा ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालात सात ठिकाणी महिलाराज आले असून अन्य तीन ठिकाणी पुरूषांना लोकनियुक्त सरपंचपदाची संधी मिळाली आहे. त्यात सरपंच पदावर पातोंडी येथे मोहन बोरसे, कळमोदा येथे सरला नरेंद्र पाटील, शिंगाडीत कविता महेंद्र बगाडे, उडखेड्यात सविता संजय गाढे, चुनवाडीत सविता रितेश सपकाळे, वाघोद्यात रवींद्र ज्ञानेश्वर कोलते, आभोडा बु.॥ येथे सुमीना गुलशेर तडवी तर खिर्डी येथे चंद्रकांत राजधर कोळी, रोझोद्यात अर्चना नीलेश बढे व चिनावलला भावना योगेश बोरोले विजयी झाल्या.