30 हजारांचा दंड वसूल ; कारवाईने खळबळ
रावेर : रावेर महसूल विभागाकडून अवैध वाळू माफियांविरुध्द धडपकड सुरूच आहे. गुरुवारी सकाळी दोन ट्रॅक्टरसह ट्रॉली जप्त करून 30 हजारांचा दंड वसुल करण्यात आला.
तापी व भोकर नदीतून अवैध वाळू उपसा माफियांकडून सर्रास सुरू असल्याने महसूल प्रशासनाने कारवाईत सातत्य राखले आहे. गुरुवारी विटवानजीक भोकर नदीत तहसीलदार विजयकुमार ढगे यांच्या मार्गदशनाखाली तलाठी हर्षल पाटील, पी.एन.नेहते, मुकेश तायडे, पी.एल.पाटील, एन.आर.चौधरी यांच्या पथकाने दोन वाहने जप्त करीत प्रत्येकी 15 हजारांचा दंड केला.