रावेर : रावेर शहरासह ग्रामीण भागात गरजु गरीब कुटुंबा पर्यंत अन्न-धान्य पोहचविण्यासाठी महसूल प्रशासनाने चांगलीच कंबर कसली आहे. आवश्यक किट्स बनवुन तहसीलदारांच्या हस्ते वाटप केल्या जात असून अनेक सामाजिक संघटना, संस्था महसूलने सक्रीय केल्या आहेत. गरीबांविषयी आपुलकी असलेले लोक स्वत:हुन पुढे येत असून मदत करण्यात हातभार लावत आहे.
तहसीलदारांच्या हस्ते कीट वाटप
रविवारी जीवनावश्यक वस्तू उषाराणी देवगुणे यांच्या हस्ते आदिवासी भागात वाटप करण्यात आले सोमवारी तहसीलदारांनी सावद्यात भेट देत रेशन दुकानांची पाहणी केली. राष्ट्रवादी शहराध्यक्ष महेमूद शेख म्हणाले की, तहसीलदारांची प्रेरणा घेऊन गावात स्व:ाच गरजु पर्यंत अन्न-धान्य वाटप केले तर शहरात लोकांना सॅनिटायझर वाटप केले. यामध्ये अनेक हिंदू-मुस्लिम सामाजिक संघटना संस्था, कोरोनासारख्या जीवघेण्या वायरस विरुध्द गरीबांना मदतीच्या भावनेतुन लढत आहे. तालुकाभरात महसूल प्रशासनाने अनेक मदतीचे हात सक्रीय केल्याने या मदतीने कोणाच्या डोळ्यातले अश्रु पुसले गेले तर कोणाच्या पोटाची भूक शांत झालेली दिसत होती.