रावेर तालुक्यात गुन्ह्यांमध्ये घट

0

रावेर (शालिक महाजन) । अप्रिय घटनांमुळे रावेर शहराची संवेदनशील म्हणून पोलीस दप्तरी ओळख असलीतरी जनतेत समन्वयासह गुन्हेगारांवर पोलीस यंत्रणेने जरब बसवल्याने गतवर्षाच्या तुलनेत यंदा क्राईम आलेख खाली आहे. 26 गुन्ह्यांमध्ये आरोपींना शिक्षा झाली असून पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांनी राबवलेल्या विविध उपक्रमांमुळे तरुण पिढी व्यसनांपासून दूर झाली आहे शिवाय 102 पैकी 92 गुन्ह्यांचा उलगडा करण्यात यंत्रणेला यशदेखील आल्याने समाजमनातून कौतुक होत आहे.

गतवर्षाच्या तुलनेत गुन्हे झाले कमी
रावेर शहर हे जिल्ह्यातील सर्वाधिक संवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते त्यामुळे येथील क्राईम आलेखही तसा आजपर्यंत चढताच राहिला आहे मात्र पोलीस प्रशासनाने कौतुकास्पद उपक्रम राबवून जनतेत सलोखा निर्माण करण्यासह विश्‍वासार्हता मिळवल्याने गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे. व्यसनांच्या आहारी गेलेल्या तरुण पिढीला परावृत्त करण्यासह चोर्‍यांना बर्‍या पैकी आळा घालण्यात यश आले आहे. पोलिस उपनिरीक्षकांचे लाचेच्या प्रकरणाचा अपवाद सोडल्यास 2016 च्रा तुलनेत 2017 वर्षात गुन्ह्यांपेक्षा तपास करण्यात पोलिसांना जास्त रश आले आह. त्यात अपघात करून पसार झालेल्या आरोपींना पकडण्याच्या सर्वाधिक घटना आहेत. 26 गुन्ह्यांमध्ये आरोपींना शिक्षा लागल्या आहेत.

पाल औटपोस्ट अप्रिय घटनांचे केंद्र
रावेर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या पाल पोलीस आउटपोष्ट हद्दीत धावत्या ट्रकमध्ये चालकाला लुटण्याच्या दोन घटना घडल्या तर अनेक चालकांना नसता मनस्ताप नको म्हणून गुन्हेदेखील दाखल केले नसल्याची माहिती आहे. या आऊट पोस्टवर पोलिसांनी अधिक लक्ष केंद्रीत करून गुन्हे न घडण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आहे.

अवैध धंद्यांवर करडी नजर गरजेची
2017 वर्ष समाधानकारक गेले असले तरी रावेर पोलीस निरीक्षक रांना पाल आउट पोष्टवर जास्त लक्ष द्यावे लागणार आहे कारण मध्रप्रदेश सीमा लागून असल्राने त्रा भागातून मोठ्या प्रमाणात गुरे इकडे रेतात तसेच ट्रक लूटीचे प्रकारदेखील येथे घडल्याने पोलिस निरीक्षकांनी ही बाब गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. या परीसरात अवैध धंदेदेखील राजरोस सुरू असल्याने त्यावरही कारवाई होणे गरजेचे आहे.

107 पैकी 92 गुन्हे उघडकीस
कारदा व सुव्यवस्था राखण्यास 2017 वर्ष रावेर पोलिसांना समाधानकारक गेले. यात चोरीच्या 17, दुचाकी चोरीचे सात तर हाणामारीचे 33, दंगलीचे सात व अपघाताचे 11 मिळून एकूण 107 गुन्हे दाखल करण्यात आले. त्यातील 92 गुन्हे तपास करून उघडकीस आणण्यात यश मिळाले तसेच अवैध दारू व जुगार 168 केसेस तर शांततेसाठी प्रतिबंधकच्या 674 केसेस करण्यात आल्या.

रात्रीच्या पेट्रोलिंगवर आहे जास्त भर
चोर्‍या-घरफोड्या टळण्यासाठी पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांनी थम्ब सिस्टीम 36 ठिकाणी लावली आहे. मात्र पाळीतील पोलीस कर्मचारी गस्तीदरम्यान तेथे लजेरी लावतात त्यामुळे गस्त टाळणार्‍यावंर कारवाई करणे पोलिसांना सोपे जाते शिवाय प्रॉपर गस्त त्यामुळे होत असल्याने चोर्‍यांचे प्रमाण नगण्य आहे.