रावेर । रावेर तालुक्यात 14 हजार 493 हेक्टर कपाशिवर गुलाबी बोंडअळीचा प्रचंड प्रादुर्भाव पडला असल्याने शेतकरी चांगलेच अडचणीत आलेले आहे. रावेर तालुक्यात यावर्षी 16 हजार 658 हेक्टरवर शेतकर्यांनी कपाशीची लागवड केली होती. त्यापैकी 14 हजार 493 हेक्टरवर बोंडअळीचा पादुर्भाव प्रचंड वाढल्याने कपाशीत उपटून टाकण्याची वेळ शेतकर्यांवर आली आहे.
बोंडअळी बाधीतांनी तक्रार द्यावी बोंडअळी बाधित शेतकर्यांनी कृषी सहाय्यक यांच्याकडे तक्रार दाखल करावी. सोबत बियाण्याचे बिल पिकांची नोंद असलेला 7/12 सोबत जोडावा. ज्या शेतकर्यांनी कपाशी काढली असेल त्यांनी जीफार्मा भरून कृषी विभागाकडे द्यावा अशी माहिती तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार यांनी सांगितले.
कृषी विभागातर्फे सर्वेक्षण सुरु
तालुकाभरात ज्या शेतकर्यांच्या शेतीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव आहे, त्यांचे सर्वेक्षण कृषी विभागातर्फे सुरू केले आहे. तसेच बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी कपाशीचे फरदड शेतकर्यांनी घेऊ नये तर दरवर्षी शेतकर्यांनी त्यांच्या शेतात नवीन पिके लागवड करण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आलेले आहेत