रावेर- तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर झाल्यामुळे शासनाकडून मदतीचे वाटप करण्यात येत असून आतापर्यंत 32 कोटींची रक्कम वाटपासाठी प्राप्त झाली आहे. महसूल विभागामार्फत दोन हेक्टरपर्यत क्षेत्र असणार्या पात्र शेतकर्यांची यादी संकलीत करण्यात आली आहे परंतु पात्र खातेदारांच्या बँक खात्यावर पैसे जमा होतात त्यासाठी बँक खाते नंबर उपलब्ध होणे गरजेचे आहे. यासाठी रावेेर तालुक्यातील तलाठी व मंडळ अधिकारी यांनी विशेष मोहीम आखुन जवळपास 70 टक्के खातेदारांचे बँक खात्याची माहिती प्राप्ती केली सून त्यावर अनुदान मा करण्याचे काम सुरू आहे
शेतकर्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन
30 टक्के शेतकर्यांनी आपल्या बँक खात्याची माहिती न दिल्याने त्यांच्या खात्यावर अनुदान जमा झाले नसल्याने तालुक्यातील सरपंच, गावामधील पदाधिकारी, पोलिस पाटील, शेतकरी बांधवांनी आपल्या खात्याची माहिती तलाठी, मंडळाधिकारी यांच्याकडे दोन दिवसांत जमा करावे जेणेकरून दुष्काळ, खरीप अनुदान वाटप करता येईल तथापि मुदतीत बँक खात्यांची माहिती प्राप्त न झाल्यास वित्तीय नियमानुसार हे े अनुदान नाईलाजाने समर्पित/शासन जमा करावे लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे. रावेर तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्यांनी सहकार्य करून शासन मदतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महसुल प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.