रावेर तालुक्यात दोन कोटी 28 लाखांच्या विकासकामांना मंजुरी

0

माजी मंत्री एकनाथराव खडसे व खासदार रक्षा खडसेंच्या प्रयत्नांना यश

रावेर- माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे यांच्या प्रयत्नातून रावेर मतदारसंघात दोन कोटी 28 लाखांच्या विकासकामांना मंजुरी मिळाली आहे. या निधीतून रावेर तालुक्यातील गावांतर्गत रस्ते, हायमास्ट लॅम्प यासह अन्य विकासकामे होणार आहेत.

रावेर तालुक्यात या कामांना मिळाली मंजुरी
कोचुर बु.॥ येथे महानुभाव समाजासाठी सभा मंडपाचे बांधकाम, सावदा ग्रामीणमध्ये हायमास्ट लॅम्प बसविणे, सांगवेत पेव्हर ब्लॉक बसविणे तसेच हायमास्ट लावणे, उदळी बु.॥ अंतर्गत रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविणे, उदळी खुर्दमध्ये गटार, स्मशानभूमीचे बांधकाम करणे, चुनवाडेत हायमास्ट लॅम्प बसविणे, वाघोदा बु.॥ ला पेव्हर ब्लॉक बसविणे, हायमास्ट लावणे, वाघोदा खुर्द अंतर्गत रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविणे, विटव्यात पेव्हर ब्लॉक बसविणे तसेच हायमास्ट लावणे. ऐनपूरला पेव्हर ब्लॉक बसविणे, सुनवाडी अंतर्गत रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविणे, कोळोदा अंतर्गत रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविणे, धामोडी अंतर्गत रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविणे, शिंगाड़ी अंतर्गत रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविणे, रेंभोटा अंतर्गत रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविणे, वाघाडी अंतर्गत रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविणे, खिर्डी खुर्द अंतर्गत रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविणे, सिंगत अंतर्गत रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविणे, भामलवाडी अंतर्गत रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविणे, पुरी येथे अंतर्गत रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविणे, गोलवाडे अंतर्गत रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविणे, तांदलवाडी अंतर्गत रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविणे, सुनोदा रंगमंच बांधकाम करणे (शेड), मस्कावद बु.॥ अंतर्गत रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविणे, मस्कावद सीम अंतर्गत रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविणे, मस्कावद खुर्द एस.टी.पीकअप शेड बांधणे, दसनुर अंतर्गत रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविणे, सिंगनुर येथे अंतर्गत रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविणे, मांगी येथे स्मशानभूमीचे बांधकाम करणे, चुनवाडे, थोरगव्हाण, आंदलवाडी, मांगलवाडी, गाते, लुमखेडा, तासखेडा, रणगाव आदी ठिकाणी गावात तसेच अंतर्गत रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविण्यात येणार असल्याचे रावेर येथे घेतलेल्या पत्रकार परीषदेत मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघाचे सरचिटणीस शिवाजीराव पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पाटील, जिल्हा परीषद सदस्य कैलास सरोदे म्हणाले.