रावेर- महसूल विभागाच्या निवडणूक शाखेकडून मतदार नोंदणी विशेष अभियान सुरू करण्यात आले आहेफ या मोहिमेचे कामकाज आणि जनजागृती करण्यासाठी प्रांताधिकारी आणि तहसीलदार प्रत्यक्ष पाहणी करणार आहे. यात गृहभेटी देऊन मतदारांशी थेट संवाद साधण्यात येईल. याबाबतची माहिती देताना तहसीलदार विजय ढगे यांनी सांगितले की, निवडणूक विभागाकडून नवमतदारांनी आणि मतदार यादी दुरुस्ती चे काम दिनांक 1 सप्टेंबरपासून सुरू असून यात 1 जानेवारी 2018 रोजी वयाची अठरा वर्षे पूर्ण करणार्या मतदारांची नोंदणी करण्यासाठी सर्वतोपरी शासनाचे प्रयत्न आहे. मतदार नोंदणी सुरू असून स्थानिक पातळीवर 308 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांची नेमणूक रावेर विधानसभा मतदार संघासाठी करण्यात आली आहे. त्यांच्या कामाची पाहणी देखील प्रांताधिकारी अजित थोरबोले गृहभेटीमधून करणार असून कर्तव्यात कसूर करणार्या अधिकार्यांवर कारवाई देखील करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. भारतीय लोकशाही बळकट करण्यासाठी नवयुवकांनी पुढाकार घेणे आवश्यक असून युवक-युवती यांनी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करून घेण्याचेदेखील आवाहन त्यांनी केले आहे.