रावेर । तालुक्यातील सातपुड्याच्या गत वैभवासाठी महाराष्ट्र शासनाच्या ‘एकच लक्ष चार कोटी वृक्ष’ या मोहिमेत वृक्ष लागवड करण्यासाठी लोकचळवळ उभी राहिली असून रावेर तालुक्यात या सप्ताहात 5 लक्ष वृक्ष लागवड होऊन आदिवासी गावांमध्ये आगामी काळात अनेक विकासात्मक योजना राबविण्यात येणार असल्याचे आमदार हरिभाऊ जावळे यांनी गारबर्दी परिसरात वनमहोत्सव शुभारंभप्रसंगी माहिती दिली.
यांची होती उपस्थिती
रावेर तालुक्यात वृक्ष लागवड सप्ताहास प्रारंभ झाला असून शुभारंभ कार्यक्रमास आमदार हरिभाऊ जावळे हे अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख उपस्थिती जिल्हा परिषद माजी शिक्षण व आरोग्य सभापती सुरेश धनके, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, पंचायत समिती सभापती माधुरी नेमाडे, उपसभापती अनिता चौधरी, वनविभागाचे उपवन संरक्षक संजय दहिवले, प्रशिक्षण केंद्राचे संचालक के.बी. भवर, उपसंचालक एल.बी. राणे, व्ही.डी. कुलकर्णी, उपवन संरक्षक अश्विनी खोपडे, सहाय्यक वनसंरक्षक आर.एस. भवर, संजय गांधी समिती अध्यक्ष विलास चौधरी, सामाजिक कार्यकर्ते कामिल तडवी, प्रवीण पाचपोहे, माऊली फाऊंडेशनचे डॉ. संदीप पाटील, अस्थिरोग तज्ञ डॉ. सुरेश महाजन, वैद्यकीय अधिकारी डॉ. बी.बी. बारेला, वैद्यकीय अधिकारी विवेक बाविस्कर तर गारखेडा, मोरव्हाल, पाल येथील सरपंच आदी मान्यवर उपस्थित होते.
वृक्षलागवड मोहिमेचा आराखडा सादर
सुरुवातीला कृषी दिनानिमित्त स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे व रोपांचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविकात वन परिक्षेत्र अधिकारी राजेंद्र राणे यांनी तालुक्यातील रोप वाटिका आणि वृक्ष लागवड मोहीम या बाबत आराखडा सादर केला. उपवन संरक्षक दहिवले यांनी मागील वर्षात वृक्ष लागवड मोहीम आणि जिवंत वृक्षांची आकडेवारी याचे प्रमाण लक्षात घेता रावेर तालुक्याचे प्रमाण राज्यात अव्वलस्थानी असल्याची सुखद माहिती दिली. पद्माकर महाजन यांनी रावेर तालुक्यातील वृक्ष लागवड मोहिमेचे कौतुक केले. सुरेश धनके यांनी देखील वन महोत्सवाबाबत शासनाची भूमिका स्पष्ट केली तर सभापती नेमाडे यांनी भाषणातून वनमहोत्सवास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दीपक नगरे यांनी केले तर आभार वनपाल विकास सोनवणे यांनी मानले.
भुसावळ नगरपालिका शाळा
नगर परिषद कर्मचार्यांमार्फत जळगाव रोडवरील मराठी मुलांची शाळा नंबर 1 परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी कर अधीक्षक सुभाष ठाकुर, कार्यालय अधीक्षक अख्तर खान, पालिका रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. किर्ती फलटणकर, महेश चौधरी, राजेश पाटील, सुरज नारखेडे, कृणाल सौपुरे, मोहन भारंबे, युवराज नरवाडे, सचिन नारखेडे, मिलिंद पाटील, अनिल भाकरे, जय पिंजाणी, विजय राजपूत, घोडेसवार आदी उपस्थित होते.
ताप्ती पब्लिक स्कुल
ताप्ती पब्लिक स्कुलमध्ये मुख्याध्यापिका निना कटलर व शिक्षकांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका कटलकर यांनी झाडांमुळेच पर्यावरणाचा समतोल राखला जात असून पर्जन्यमान नियमित राखले जाते. तसेच प्रदुषणाला देखील झाडांमुळेच आडा बसतो. त्यामुळे वृक्षारोपण करणे हि काळाची गरज आहे, यासाठी वृक्षारोपण तसेच त्याचे संवर्धन करणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच प्रत्येकाच्या घरांच्या परिसरात किमान एक तरी झाड लावावे व ते जगवावे आणि स्वच्छ भारत अभियानात सहभागी होऊन आपले योगदान द्यावे अशी शपथ मुख्याध्यापिका कटलर यांनी दिली. प्रसंगी विजीनीय बर्नाड, वंदना डिसूजा, कविता सपकाळे, विद्या गॉटिंग, विद्या सोळंके, स्मिता नन्नवरे आदी उपस्थित होते. याप्रसंगी इतर शिक्षकांनीही वृक्षारोपण केले.
मुक्ताईनगर पंचायत समिती
मुक्ताईनगर येथे पंचायत समिती आवारात वृक्ष लागवड करण्यात आली. पंचायत समिती सभापती शुभांगी भोलाणे यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आली. यावेळी सभापती भोलाणे यांनी पर्यावरणात वृक्षांचे महत्वाबाबत माहिती दिली. यानंतर उपसभापती प्रल्हाद जंगले, पंचायत समिती सदस्या सुवर्णा साळुंखे, पंचायत समिती सदस्य विकास पाटील, जिल्हा परिषद सदस्या वैशाली तायडे, जिल्हा परिषद सदस्या वनिता गवळी, किशोर चौधरी, बैरागी, चंद्रकांत भोलाणे, सर्व पंचायत समिती कर्मचारीवृंद व विद्यार्थीनी वृक्षारोपण केले.