रावेर : तालुक्यातील पाल या आदिवासी भागात वादळी पावसाने झालेल्या पडझड व नुकसानीची सोमवारी तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी पाहणी केली. संबधित तलाठ्यांना पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले. रविवारी आदिवासी भागात वादळी पावसामुळे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर सोमवारी नुकसानग्रस्त भागाची पाहणी तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी केली. पाल, लालमाती, सहस्त्रलिंग आदी गावांना भेटी देवून पाहणी करण्यात आली तसेच चिनावल व कुंभारखडा येथे कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण आढळल्यानंतर कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आला असून त्याचीदेखील पाहणी करण्यात आली. पंचनामे झाल्यानंतर नुकसानीचा आकडा समोर येईल, असेही तहसीलदार म्हणाल्या.