रावेर तालुक्यात महामार्गावर अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळले ; शेतकर्यांना फटका
रावेर- केरळनंतर महाराष्ट्रात दाखल झालेल्या मान्सुसने वातावरणात बदल होवून काहीसा दिलासा मिळाला असतानाच शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास तालुक्यातील काही भागात वादळी वार्यासह झालेल्या पावसाने शेकडो हेक्टरवरील केळीला फटका बसला आहे तर कर्जोदजवळ महामार्गावर अनेक वृक्ष उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प झाली. रावेर-अंकलेश्वर महामार्गावर भरधाव आयशर वाहनावर झाड पडल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर नागरीकांनी मोठी गर्दी केली.
वाहनावर झाड पडल्याने चालकाचा मृत्यू
रावेरकडून अंकलेश्वरकडे जाणार्या आयशर (एम.एच.04 सी.जे.4471) वाहनाच्या चालक साईडच्या कॅबिनवर झाड उन्मळून पडल्याने चालकाचा मृत्यू झाला. हॉटेल राजेश्वरीजवळ ही घटना घडली. दरम्यान, तालुक्यातील अहिरवाडी, पाडळे, नेरूळ भागात जोरदार वादळामुळे शेकडो हेक्टरवरील केळी आडवी झाल्याने केळी उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. प्रशासनाने पंचनामे करण्याची मागणी होत आहे.