रावेर तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत तिघांचा मृत्यू

0

रावेरच्या तरुणाने प्यायले विष तर मोरगावच्या युवकाची आत्महत्या व अहिरवाडीच्या युवकाची विहिरीत उडी

रावेर – शहरासह तालुक्यात तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांनी आपली जीवनयात्रा संपली. रावेर शहरातील युवकाने विष प्राशन करून तर मोरगावच्या युवकाने गळफास घेवून तसेच अहिरवाडीच्या युवकाने विहिरीत उडी घेत जीवनयात्रा संपली. या प्रकरणी रावेर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. गेल्या तीन दिवसात आत्महत्या करण्याची ही पाचवी घटना असल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

तीन तरुणांच्या मृत्यूने तालुका हादरला
पहिल्या घटनेत तालुक्यातील मोरगाव खुर्द येथील युवराज सीताराम चौधरी (28) या युवकाने आपल्या घरातील छतास दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून मध्यरात्री आत्महत्या केली. मंगळवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. दुसर्‍या घटनेत तालुक्यात अहिरवाडी येथे बुधवारी सकाळी सात ते नऊ वाजेच्या दरम्यान मुकेश पंडीत महाजन (20) या तरूणाने मजुरीचे पैसे आणण्यास जातो, असे घरी सांगून घर सोडले व नंतर त्याने गावातील ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठ्याच्या विहिरीत उडी मारून त्याने आपली जीवनयात्रा संपवली. तिसर्‍या घटनेत रावेर शहरातील स्वामी विवेकानंद चौकातील रहिवासी तुकाराम उर्फ राजू दशरथ महाजन (48) यांनी बुधवारी सकाळी काहीतरी विषारी पदार्थ सेवन केले. त्यास रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉ.बारेला यांनी मयत घोषीत केले. या दोन्ही घटनांबाबत रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल जावरे, श्रीराम वानखेडे, पोलीस कॉन्स्टेबल संदीप धनगर, विलास तायडे, संदीप खंडारे करीत आहे.