रावेर तालुक्यात शंभर शेळ्या दगावल्या ?

0
विषारी पाण्यामुळे दुर्घटना घडल्याचा संशय
रावेर :- तालुक्यातील शेतशिवारात शंभरावर शेळ्या दगावल्याची घटना बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. शेळ्या दगावण्यामागे विषारी पाणी प्राशन केल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. या घटनेनंतर रावेर तहसीलदार विजयकुमार ढगे यांच्यासह महसूल प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी भेट दिली. रावेर तालुक्यात काही दिवसांपूर्वीच मेंढपाळांनी आपल्या शेळ्या चराईसाठी या भागात आणल्याचे समजते. विषारी पाण्यामुळे या शेळ्या दगावल्याचा संशय असून या प्रकारामुळे मेंढपाळांना लाखो रुपयांच्या हानीला सामोरे जावे लागत असल्याचे सांगण्यात आले. प्रशासनाने पंचनामा करावा व भरपाई द्यावी, अशी मागणी मेंढपाळांनी केली.