रविवारी पुरी-गोलवाडीत वाघाला पाहताच उडाली भंबेरी
रावेर:- मुक्ताईनगर तालुक्यातील डोलारखेडा येथील शेतकर्याचा डोलारखेडा फॉरेस्ट कॅम्पार्टमेंटमध्ये पट्टेदार वाघाने फडशा पाडल्याची घटना ताजी असतानाच तालुक्यातील शेत-शिवारासह मोरगाव, केर्हाळेनंतर रविवारी पुन्हा पुरी-गोलवाडेत वाघाचे दर्शन झाल्याने शेतकर्यांमध्ये घबराट पसरली आहे. या परीसरात एक ते दोन पट्टेदार वाघांचे अस्तित्व असल्याच्या वृत्ताला वनक्षेत्रपाल आर.जी.राणे यांनी दुजोरा दिला. रविवारी व्याघ्रदर्शनानंतर वनविभागाने पथकाने घटनास्थळी जावून पाहणी केली. शेतकर्यांनी शेत-शिवारात जाताना सतर्कता बाळगावी, असे आवाहन वनविभागाने केले आहे.