रावेर तालुक्यात सूर्यकन्येचा जयघोष ः जन्मोत्सव उत्साहात

0

रावेर- टाळ मृदुंगाचा गजर करीत व तापी मैय्या की जयच्या जयघोषात सुर्यकन्या तापी नदी जन्मोत्सव गुरुवारी तालुक्यात मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात संत महात्मे व मान्यवरांच्या उपस्थित साजरा करण्यात आला. तालुक्यातील निरूळ, पाडळे खु।्। पाडळे बु।्। येथील भाविक भजनी मंडळ टाळ मृदंगाच्या गजरात दिंडीनेे अजनाड येथे दाखल झाले. यावेळी ग्रामस्थांनी दिंडीचे स्वागत केले. येथून दिंडी तापी नदी किनार्‍यावर जावून विधीवत कलश, गणपती पुजन करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
महामंडलेश्वर जनार्दन महाराज, भरतदासजी महाराज, विष्णूदास महाराज, भक्ती किशोरदास महाराज तसेच विनायक महाजन यांनी सपत्नीक विधीवत तापी नदीवर जलाभिषेक करून पूजन केले. यानंतर तापी नदीला साडी, चोळीचा खण, श्रीफळ अर्पण करण्यात आले. आरती करण्यात आली. पौरोहित्य नथ्थूशास्त्री दुबे, रमाकांत सोनी व कपिल महाराज यांनी केले. भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. प्रसंगी सुरेश धनके, जिल्हा परीषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, पद्माकर महाजन, सुनील पाटील, वासुदेव नरवाडे , हरलाल कोळी, जुम्मा तडवी, विनोद पाटील, कांतीलाल महाजन, ऋषीकेश कुलकर्णी यांच्यासह पंचक्रोशीतील महिलांसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित संत व मान्यवरांचे स्वागत विनायक महाजन, प्रल्हाद महाजन, विक्रम महाजन, विजय महाजन आदींनी केले. कार्यक्रमाचे आयोजन सचिन महाजन, गोपाळ पाटील, प्रल्हाद पाटील, सुरेश महाजन, दीपक महाजन, स्वप्नील पाटील यांनी केले.

नद्यांसह वृक्षांचे संवर्धन गरजेचे -महामंडलेश्‍वर जनार्दन महाराज
भारतीय संस्कृती महान आहे. यात निसर्गाचे पूजन केले जाते. त्यांच्या जन्मोत्सव व पुजे बरोबरच नद्या व वृक्षांचे संवर्धन करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महामंडलेश्वर जनार्दन महाराज यांनी केले. ते पुढे म्हणाले की, भारतीय संस्कृतीमध्ये वृक्ष व नद्यांना अनन्य साधारण महत्व आहे. इतर देशांमध्ये वृक्ष तोडल्यास व नद्या प्रदूषीत केल्यास दंड आकारला जातो. आपल्या संस्कृतीत त्यांचे पूजन केले जाते मात्र सध्या वृक्ष तोड, भ्रूणहत्या, गो हत्या या तीन कारणांनी सृष्टी चक्रात बदल झाला आहे. हे बंद होणे गरजेचे आहे. ऑक्सीजन हे जीवनावश्यक आहे. तो फक्त आपल्या निसर्गाकडूनच मिळू शकते. प्रसंगी डॉ.अतुल सरोदे, जिल्हा परीषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, सुरेश धनके, पद्माकर महाजन यांनी मनोगत व्यक्त केले.