रावेर तालुक्यात हृदयविकाराने 12 तासात तिघांचा मृत्यू

0

रावेर- रावेर तालुक्यात 12 तासात वेगवेगळ्या ठिकाणी हृदयविकाराने तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. तालुक्यातील अहिरवाडी येथे रविवारी सायंकाळी कैलास फकीरा महाजन (42) यांचा तर याच दिवशी रात्री श्री ग.गो.बेंडाळे हायस्कूलचे शिक्षक राजेंद्र पी.इंगळे ( 45) यांचा तसेच सोमवारी सकाळी विवरे येथील अशोक पुंजाजी तळेले या तिघांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

बदलत्या जीवनमान ठरतेय तापदायक
बदलते जीवनमान, खाण्या-पिण्याच्या समसींमुळे नागरीकांचे आरोग्याकडे दुर्लक्ष झाले असून हीच बाब हृदयविकारासाठी आमंत्रण ठरत आहे त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असून दैनंदिन जीवनात प्रत्येकाने तणावमुक्त रहावे तसेच नियमित आरोग्याची तपासणीकरून जेवणात साधा आहार घ्यावा, असा सल्ला वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी.बारेला यांनी दिला आहे. नागरीकांनी दररोज किमान अर्धा तास योगासन करायला हवे तसेच कपालभाती, सुदर्शन क्रिया, अनुलोम-विलोम यारखे योग प्रणायाम करण्याचा सल्ला विपश्यना तज्ञ देवलाल पाटील यांनी दिला आहे.