रावेर तालुक्याला मिळणार ‘लाल दिवा’;

0

रावेर । जिल्हा परिषदेत भाजपाला बहुमत मिळाल्यानंतर आता अध्यक्षपदासाठी हालचाली सुरु झाल्या आहे. यंदा लाल दिवा रावेर तालुक्याला देण्यासाठी जिल्ह्यावरील नेते अनुकूल असून विद्यमान अध्यक्षपद जामनेर तालुक्याला आहे. त्यामुळे इतर तालुक्याला लाल दिवा देण्याच्या तयारीत नेते व भाजपा जिल्हा पदाधिकारी आहे. अध्यक्षपद महिला ओबीसीसाठी राखीव असल्याने रावेरातून पाल-केर्‍हाळा गटातून नंदा पाटील तर ऐनपूर-खिरवड गटातून रंजना पाटील निवडून आल्या आहे. त्यामुळे यंदा रावेरला अध्यक्षपद देवून भाजपा पक्ष मजबूत सुध्दा करणार आहे.

नंदा पाटील अध्यक्षपदाच्या उमेदवार
भाजपातर्फे पाल-केर्‍हाळा गटातून निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्या नंदा पाटील या पहिल्यांदाच निवडून आल्या आहे. भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील यांच्या त्या पत्नी असून जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या भाचे सून आहे. त्यात अध्यक्षपद रावेर तालुक्याला देण्यासाठी जिल्ह्यातील नेेते व पदाधिकारी अनुकूल असल्याने तालुक्यातून नंदा पाटील यांना अध्यक्षपदाचे दावेदार मानले जात आहे.

सामाजिक विचार केल्यास रंजना पाटील पर्याय
भाजपातर्फे ऐनपूर-खिरवड गटातून निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्या रंजना पाटील या येथून निवडून आल्या आहे. या गटातील अनेक गावे माजी महसुलमंत्री एकनाथराव खडसे यांच्या मतदार संघातील असून समाजात सक्रीय सहभाग असलेले व मराठा समाजाचे असलेले प्रल्हाद पाटील यांच्या त्या पत्नी आहे. जिल्ह्यात सद्यस्थिती यापुर्व भाजपातर्फे माजी महसुलमंत्री एकनाथराव खडसे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन पक्षातर्फे मंत्री आहे. मराठा मोर्चामुळे भाजपा अध्यक्षपद मराठा समाजाला देवून भाजपाला खुश करु शकते.