रावेर दंगल : आतापर्यंत 135 आरोपींना अटक

0

रावेर ः दोन गटात झालेल्या दंगलीतील आरोपींना अटक करण्याची कारवाई पोलिसांकडून सुरू असून आतापर्यंत 135 आरोपींना अटक करण्यात आली आहे. रावेर दंगलीतील अटक केलेल्या बहुतांशी आरोपींची नंदुरबारच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे तर पोलिसांच्या रडारवर असलेले अजूनही काही आरोपी पसार असल्याने त्यांचा शोध सुरू आहे.

अपर पोलिस अधीक्षकांनी घेतला आढावा
अपर पोलीस अधीक्षिका भाग्यश्री नवटके यांनी येथे भेट देऊन दंगल प्रकरणातील आरोपींच्या अटकेचा व इतर कामकाजाच्या माहितीचा आढावा घेतला. दंगलीत आरोपींच्या मालमत्ता जप्त करून ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे व पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी सांगितले.