प्रस्ताव दाखल केल्यापासून 40 दिवसाच्या आत मिळणार परवाना
रावेर- शहरातील नागरीकांना बांधकाम परवानगीसाठी नगरपालिकेच्या फेर्या माराव्या लागत होत्या परंतु नागरीकांची होणारी दमछाक टाळण्यासाठी रावेर नगरपालिकेने ऑनलाईन बांधकाम परवाना देण्यास सुरुवात केली आहे. नगरपालिकेने विकास विभागाच्या निर्देशानुसार नागरीकांना बांधकाम परवानगी देण्याच्या सुविधेचा शुभारंभ शहरातील भास्कर दयाराम चौधरी यांना ऑनलाईन परवानगी देऊन केली. यावेळी मुख्याधिकार प्रशांत सरोदे, नगराध्यक्ष दारा मो.जाफर मो., उपनगराध्यक्षा संगीता अग्रवाल, सिव्हील इंजि.धनराज राणे, संगणक अभियंता रामदास शिंदे, आर्किटेक गौरव भंगाळे आदी उपस्थित होते.
नागरीकांचा मनस्ताप होणार कमी
शहराच्या हद्दीतील नागरीकांना बांधकाम परवानगीसाठी पालिकेच्या फेर्या माराव्या लागत होत्या. यात नागरीकांचा वेळ व श्रम वाया जात होता. यावर उपाय म्हणून व पालिकेच्या कारभारात पारदर्शकता यावी यासाठी शासनाच्या नगर विकास विभागाने तयारकेलेल्या बिल्डिंग परवानगी व्यवस्थापन प्रणालीद्वारे नागरीकांना प्रस्ताव दाखल केल्यापासून 40 दिवसांच्या आत परवाना मिळणार आहे.