रावेर- रावेर नगरपालिकेच्या उपनगराध्यपदी संगीता शिरीष वाणी यांची गुरूवारी बिनविरोध निवड करण्यात आली. पालिकेच्या सभागृहात नगराध्यक्ष दारा मोहंमद जफर मोहंमद यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार विजयकुमार ढगे होते. उपनगराध्यक्ष पदासाठी वाणी यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने बिनविरोध निवडीची घोषणा निवडणूक अधिकारी ढगे यांनी केली.
यांची होती निवडीच्या सभेला उपस्थिती
नगरसेवक अॅड.सुरज प्रकाश चौधरी, प्रल्हाद रामदास महाजन, शारदाबाई देविदास चौधरी, पार्वताबाई गणपत शिंदे, राजेंद्र रामदास महाजन, संगीता सूर्यकांत अग्रवाल, संगीता भास्कर महाजन, यशवंत वासुदेव दलाल, असदुल्ला खा, महेबूब खा पठाण, हमीदाबी अयूब खा, ललिता मल्हारी बर्वे, आसीफ मोहंमद दारा मोहंमद, शे.नुसरत यास्मिन कलीम, शे.सादिक अब्दुल नबी, सुधीर गोपाल पाटील, रंजना योगेश गजरे, जगदीश नथ्थू घेटे, प्रकाश श्रीराम अग्रवाल आदी उपस्थित होते.