रावेर- ग्रामीण जनतेच्या समस्या सोडविण्याची जबाबदारी असलेल्या अधिकार्यांच्या दांड्यांमुळे तहकूब झालेली पंचायत समितीची आढावा बैठक मंगळवारी सभापती माधुरी नेमाडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीत शैक्षणिक, कृषी, महावितरण, परीवहन, समाज कल्याण विभागातील अधिकार्यांनी उपस्थित सदस्यांना कामकाजाची माहिती दिली. यावेळी प्रभारी गटविकास अधिकारी एच.एल.तडवी, उपसभापती अनिता चौधरी, पंचायत समिती सदस्य प्रतिभा बोरोले, योगीता वानखेडे, जुम्मा तडवी, जितु पाटील आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हा परीषद बांधकाम विभाग, सिंचन विभाग, सार्वजनिक बांधकाम, शिक्षण विभाग, कृषी विभाग, एकात्मिक बालविकास तसेच पंचायत समिती कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.