रावेर- रावेर पंचायत समितीच्या वाहनावरील चालकास क्रोबा जातीच्या विषारी सापाने दंश केल्याची घटना बुधवारी घडली. चालक प्रदीप सोनवणे यांना शहरानजीक असलेल्या बिजासनी माता मंदिराजवळील झाडाखाली उजव्या पायाजवळ सर्पदंश झाला. त्यांना चक्कर येऊन उलट्या होऊ लागल्यानंतर ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टर बी.बी.बारेला यांनी त्यांना जळगाव हलवण्याचा सल्ला देण्यात आला. पंचायत समितीचे सर्व कर्मचारी ग्रामीण रुग्णालयात येऊन त्यांना निरमय हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सोनवणे यांना होणारी लक्षणे पाहता त्यांना कोब्रा जातीच्या सापाने दंश केल्याचे डॉ.आर.एस.पाटील यांनी सांगितले.