रावेर पंचायत समितीवर भाजपाचा झेंडा

0

रावेर । तालुक्यात पंचायत समिति निवडणुकीत आठ जागा जिंकून भाजपाने झेंडा फड़कविला आहे. तर राष्ट्रवादीला दोन, कॉग्रेस व शिवसेनेला प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावे लागले. जिल्हा परिषदेत भाजपाला चार तर कॉग्रेस राष्ट्रवादीला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळविता आला आहे. येथील तहसील कार्यालयात निकाल जाहिर झाला. निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी काम पाहिले.

गण निहाय उमेदवारांना मिळालेली मते
विवरे – योगेश पाटिल (राष्ट्रवादी) विजयी 3 हजार 302, अजबराव पाटिल 2 हजार 19, योगेश महाजन 1 हजार 838, अतुल महाजन 272, वाघोदा- योगिता वानखेड़े (भाजपा) विजयी 3 हजार 252, सुभाष गाढ़े 1 हजार 545, साहेबराव ठाकने 1 हजार 317, युवराज भालेराव 86, सुभाष काकड़े 158, राहुल गाढ़े 207, वंदना गायकवाड़ 509, उत्तम वाघ 2 हजार 239, निभोरा – दीपक पाटिल (राष्ट्रवादी) विजयी 3 हजार 79, ज्ञानदेव नेमाडे 2 हजार 350, दिनेश पाटिल 2 हजार 828, मनीषा ठाकरे 1 हजार 681, रमेश येवले 544, राहुल सोनार 123. तांदलवाडी – कविता कोळी (भाजपा) विजयी 5 हजार 447, तृनाली खाचने 1 हजार 131, कल्पना पाटिल 4 हजार 377 खिरवळ – जुम्मा तडवी (भाजपा) विजयी 4 हजार 561, फकीरा तडवी 4 हजार 182, गणी तडवी 2 हजार 466. ऐनपुर – जितेंद्र पाटिल (भाजपा) विजयी 4 हजार 521, गणेश बोरस 2 हजार 65, रवींद्र महाजन 3 हजार 513, राजू सवर्णे 1 हजार 258, युवराज तायड़े 216. पाल – प्रकाश महाजन (भाजपा) विजयी 4 हजार 373, रविंद्र महाजन 2 हजार 14, देवीदास हळपे 3 हजार 352. केर्‍हाळे – धनश्री सावळे (भाजपा) विजयी 4 हजार 854, अलका पाटिल 3 हजार 275, खिरोदा – प्रतिभा बोरवले (कॉगेस) विजयी 5 हजार 435, संगीता चौधरी 4 हजार 45. चिनावल – माधुरी नेमाडे (भाजपा) विजयी 4 हजार 228, प्रीती भालेराव 589, * थोरगव्हाण गणात – रूपाली कोळी (शिवसेना) विजयी 4 हजार 265, तृप्ती तायड़े 1 हजार 296, * मस्कावद – अनिता चौधरी (भाजपा) विजयी 4 हजार 970, साधना महाजन(कॉग्रेस) 2 हजार 564, माधुरी सपकाळे 1 हजार 978 मते

जि.प. गटनिहाय उमेदवार
पाल- केर्‍हाळा गटात नंदा पाटील (भाजपा) विजयी 9 हजार 578, सुशीला जाधव (कॉग्रेस) पराभूत, मानसी पवार (शिवसेना) 3 हजार 821. चिनावल – खिरोदा गटात सुरेखा पाटील (कॉग्रेस) विजयी 10 हजार 283 मते, पूजा वायकोळे (भाजपा) 8 हजार 205 मते. विवरे- वाघोदा गटात आत्माराम कोळी (राष्ट्रवादी) विजयी 5 हजार 834 पराभूत जफरुल्ला जमादार (कॉग्रेस) 2 हजार 388, मुबारक तडवी (शिवसेना) 3 हजार 747, गोमती बारेला (भाजपा) 5 हजार 686. खिरवळ -ऐनपुर गटात रंजना पाटिल (भाजपा) विजयी 9 हजार 462 मते, बेबाबाई पाटिल (राष्ट्रवादी) 7 हजार 767, सुलोचना पाटिल (शिवसेना) 5 हजार 463. निंभोरा-तांदलवाड़ी गटात नंदकिशोर महाजन (भाजपा) विजयी 8 हजार 307, सुनील कोंडे (राष्ट्रवादी) 5 हजार 872, भास्कर पाटिल (शिवसेना) 6 हजार 976, किशोर पाटिल (अपक्ष) 250, काशीनाथ शेलोडे(अपक्ष) 127. थोरगव्हाण-मस्कावद गटात कैलास सरोदे (भाजपा) विजयी 8 हजार 568, कमलाकर पाटिल (शिवसेना) 7 हजार 165, हितेंद्र पाटील (कॉग्रेस) 3 हजार 303 मते मिळाली.