रावेर पंचायत समिती सभापती व कृषी अधिकार्‍यांमध्ये जुंपली

0

पंचायत समितीची आढावा बैठक गाजली ; सभापती बियाणे मागत असल्याच्या आरोपाने वाढला वाद

रावेर- शेतकर्‍यांच्या प्रश्नावरून तालुका कृषी अधिकारी व पंचायत समिती सभापती यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. कृषी अधिकारी लोकप्रतिनिधिच्या प्रश्नोत्तरांनी रावेर पंचायत समितीची सोमवारी झालेली आढावा बैठक चांगलीच गाजली. रावेर पंचायत समितीची मासिक आढावा बैठक सभापती माधुरी नेमाडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी बैठकीत कृषी विभागाच्या बियाणे वाटपावरून लोकप्रतिनिधी व कृषी अधिकार्‍यांमध्ये चांगलीच तू-तू-मैं-मैं झाली येथील कृषी झाली. कृषी अधिकारी एस.एस.पवार मासिक बैठकीत मागितलेली माहिती देत नाही, माहिती देण्यास मी तुमचा बांधील नाही, अशा शब्दात बांधील नाही, अशा शब्दात बोलुन लोकप्रतिनिधींचा अवमान करीत असल्याची माहिती सभापती माधुरी नेमाडे यांनी दिली. मागितलेली माहिती बैठकीत पूर्ण दिली असून बियाणे वाटपाचा जनरल कोटा संपलेला असतांना लोकप्रतिनिधी बियाणे देण्यास सांगतात, असे कृषी अधिकार्‍यांनी सांगितल्यानंतर उभयतांमध्ये तु तु मैं मै झाली.

यांची होती बैठकीला उपस्थिती
बैठकीला सभापती माधुरी नेमाडे, उपसभापती अनिल चौधरी, प्रभारी गटविकास अधिकारी हबीब तडवी, पंचायत समिती सदस्य, धनश्री सावळे, योगीता वानखेडे, कविता कोळी, प्रतिभा बोरोले, दीपक पाटील, योगेश पाटील, जितेंद्र पाटील आदी सदस्य उपस्थित होते. तालुक्यातील महावितरण, जलसंधारण सार्वजनिक बांधकाम विभाग, पुनर्वसन विभाग, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.