रावेर पंचायत समिती सभापतीपदी जितेंद्र पाटील बिनविरोध

0

उपसभापतीपदी रावेरचे पी.के.महाजन : निवडीनंतर जल्लोष

रावेर- रावेर पंचायत समितीच्या सभापतीपदी निंबोल येथील 30 वर्षीय अविवाहित जितेंद्र पाटलांना यांना मान मिळाला असून उपसभापती पदावर रावेरचे पी.के.महाजन यांची बिनविरोध वर्णी लागली. पंचायत समितीवर पुन्हा भाजपानेच वर्चस्व कायम राखण्यात यश आले आहे. पदाधिकारी निवडीसाठी गुरुवारी विशेष सभा बोलविण्यात आली. सभापतीपदासाठी जितेंद्र पाटील (निंबोल) तर उपसभापती पदासाठी पी.के.महाजन यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी बिनविरोध निवडीची घोषणा केली.

यांची होती उपस्थिती
विशेष सभेला पंचायत समिती सदस्य कविता कोळी, धनश्री सावळे, अनिता चौधरी, माधुरी नेमाडे, योगीता वानखेडे, प्रतिभा बोरोले, योगीता वानखेडे, जुम्मा तडवी, योगेश पाटील, दीपक पाटील, रुपाली कोळी आदींची उपस्थिती होती. निवडीची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. निवडणुकीसाठी सहाय्यक गटविकास अधिकारी हबीब तडवी, लोळपे यांनी सहकार्य केले.

नूतन पदाधिकार्‍यांवर शुभेच्छांचा वर्षाव
माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पदमाकर महाजन, भाजपा युवा जिल्हा उपाध्यक्ष अमोल पाटील, बाजार समिती सभापती श्रीकांत महाजन, भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, सरचिटणीस वासुदेव नरवाडे, महेश चौधरी, माजी तालुकाध्यक्ष सुनील पाटील, शिवाजीराव पाटील, हरलाल कोळी, संदीप सावळे, माजी सरपंच विशाल पाटील, सरपंच राहुल पाटील, उपसरपंच विजय पाटील, विटवे सरपंच भास्कर चौधरी, मोहन काशीनाथ पाटील, रामदास पाटील, ईश्वर पाटील, मधुकर राजाराम पाटील, शितल पाटील यांच्यासह भाजपा पदाधिकारी व लोकप्रतिनिधी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सभापतीपदासाठी झाली रस्सीखेच
पंचायत समिती सभापतीपद मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात देण्याचे ठरल्यानंतर कविता कोळी व जितेंद्र पाटील यांच्यात सभापती पदासाठी रस्सीखेच झाला. शासकीय विश्रामगृहावर भाजपा तालुका कोअर कमेटीची तब्बल एक ते दिड तास चर्चा झाल्यानंतर अखेर दोघांमध्ये ठरल्यानंतर जितेंद्र पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

30 वर्षानंतर नातवाला मिळाली संधी
निंबोल येथील आजोबा दुलबा राजाराम पाटील हे रावेर पंचायत समितीला 1990 मध्ये सभापती होते. त्यानंतर जितेंद्र श्रीराम पाटील हे आज तब्बल 30 वर्षा नंतर सभापती पदावर विराजमान झाल्याने निंबोल गावातही आनंदाचे वातावरण आहे.