रावेर- रावेर परीसरातील दगडी खाणीच्या पाण्याच्या डोहात एका ३५ वर्षीय इसमाचा बुडून मृत्यु झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. रविंद्र विठ्ठल पाटील (गुजर, वय ३५, रा.ऐनपुर, ता. रावेर) हा रावेर शहराला लागून असलेल्या आसराची बर्डीच्या दगडी खाणीत साचलेल्या पाण्यात बुडून मृत झाला. या प्रकरणी भगवान सूरदास यांनी रावेर पोलिसात दिलेल्या खबरीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार बीजु जावरे करीत आहेत.