रावेर पालिकेतर्फे स्वच्छतेसाठी पथनाट्यातून प्रबोधन

0
रावेर  : शहर स्वच्छ व सुंदर होण्याच्या दृष्टीने रावेर पालिकेने कंबर कसली असून त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी शहरातील विविध भागात स्वच्छतेवर आधारीत पथनाट्य सादर करून जनजागृती करण्यात आली.
शहरात स्वच्छता अभियानाला अधिक भर मिळावा यासाठी विद्यार्थिनींनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, महात्मा फुले चौक, कमलाबाई गर्ल्स हायस्कूल आदी ठिकाणी पथनाट्य सादर केले. नगराध्यक्ष दारा मोहम्मद, उपनगराध्या रंजना गजरे , मुख्याधिकारी प्रभाकर सोनवणे, नगरसेवक, आसीफ मोहम्मद, अयूब खा, अ‍ॅड.योगेश गजरे, मुन्ना अग्रवाल,  शिवाजी महाजन आदींची उपस्थिती होती.