रावेर पालिकेत ईपीएफ घोटाळा नाही

0

नगरपालिक प्रशासनातर्फे पत्रकार परीषदेत दावा

रावेर- रावेर नगरपालिकेच्या ईपीएफ मध्ये घोटाळा झाला नसून सर्व काही नियमानुसार झाले आहे, नगरसेवक अ‍ॅड.सुरज चौधरी यांचे आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा नगरपालिकेतर्फे शुक्रवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परीषदेत करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी रवींद्र लांडे, नगराध्यक्ष दारा मोहम्मद, नगरसेवक आसीफ मोहम्मद सादिक शेख आदी उपस्थित होते.

ठेकेदारांची डिपॉझिट केली जप्त
पदाधिकार्‍यांनी सांगितले की, ईपीएफकडून कलम 32 नुसार रक्कम पालिकेकडून वसूल करण्यात आली असून पालिकेने 2013 च्या कायद्यानुसार ठेकेदारांची डिपॉझिट जप्त केली आहे. 2011 ते 2016 ची ईपीएफ ने 2017 मध्ये 40 लाख सात हजार 223 रुपये पालिकेकडून कलम 32 नुसार वसूल करण्यात आली आहे. पालिकेने 2013 च्या कायद्यानुसार 13 ठेकेदारांची अनामत रक्कम पूर्ण जप्त केली आहे. यामध्ये जळगाव येथील अशोक सोनवणे यांनी 74 हजार 130 रुपये, मुक्ताईनगर येथील सचिन भोंबे यांची दोन लाख 31 हजार 342, ठाणे येथील आरएम इंजिनिअर्सची दोन लाख 97 हजार 561, योगराज कन्ट्रकशनची चार लाख 22 हजार 165, अष्टविनायक सहकारी बहुउद्देशीय स्वयं संस्थेची तीन लाख 12 हजार 660, जळगाव येथील जनहित फौंडेशनची एक लाख 33 हजार 647, शीतल पुंडलिक पाटील, डोलारखेडा यांची 89 हजार 665, वसंत बाजीराव पाटील यांची 45 हजार 938, रावेर येथील राजेंद्र पंढरीनाथ चौधरी यांची दोन लाख 98 हजार 175 पुन्हा दोन लाख 98 हजार 175, गोपाल लोहार यांची एक लाख 10 हजार 862, रावेर येथील राजेंद्र भादू चिनावलकर यांची तीन लाख 98 हजार 676, एस.टी.नाईक यांची सहा लाख 77 हजार 795, खिर्डी येथील जितेंद्र जगन्नाथ पाटील 12 लाख 30 हजार 468 रुपये मिळून 40 लाख सात हजार 222 रुपयांची अनामत जप्त करण्यात आली.