रावेर। रावेर शहर हागणदारी मुक्त व स्वच्छ शहर असल्याचा निर्वाळा केंद्राच्या पथकाने दिला आहे. यामुळे पालीकेला 75 लाख रूपये मिळणार आहेत. या निधिचा उपयोग शहरात वैयक्तिक शौचालये व शहराच्या स्वच्छतेसाठी वापरण्यात येतील अशी माहिती नगराध्यक्ष दारा मोहंमद व आरोग्य व स्वच्छता सामितीचे सभापती सुरज चौधरी यांनी आज सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.
ऑनलाईन अहवाल जाहीर
गेल्या एक दिड माहिन्यापासून शहरात स्वच्छता आहे. राज्य शासनाकडून पालिकेला 25 लाख रूपये व 1 जून रोजी केंन्द्रीय पथकाने रावेर येथे स्वच्छतेची पहाणी केली. नुकताच ऑनलाईन अहवाल आला आहे. शहर स्वच्छ व हागणदारी मुक्त असल्याचा निर्वाळा देण्यात आला आहे. यामुळे केंद्राकडून 75 लाख रुपये मिळणार आहे.
यांची होती उपस्थिती
शहर स्वच्छतेचे खरे श्रेय पालिकेच्या सफाई कामगारांना तसेच शहरातील नागरीकांनी केलेल्या सहकार्यामुळे आहे. केंद्र, राज्य व पालिकेतील निधी हा केवळ स्वच्छतेसाठी तसेच शहरात वैयक्तिक शौचालयासाठी वापरण्यात येईल. केवळ केंद्र, राज्य सामिती स्वच्छता पाहणीसाठी येणार म्हणून स्वच्छता केली. असे नसून या पूढेही ही स्वच्छता कायम ठेवण्याचा पालीका प्रशासन व पदाधिकारी यांचा भर राहिल. यावेळी नगराध्यक्ष दारा मोहंमद, उपनगराध्यक्ष सुधिर पाटील, अॅड. सुरज चौधरी यांनी दिली. यावेळी नगरसेवक आसिफ मोहमद, अॅड. योगेश गजरे, सादिक शेख, राजेंद्र महाजन, असदखॉ, गणपत शिंदे, शिरीष वाणी, अयुबखॉ पठाण, मुन्ना अग्रवाल, धोडू वाणी उपस्थित होते.