व्हा.चेअरमन अशोक महाजन यांची निवड
रावेर: रावेर शहरातील दि पिपल्स बँकेच्या चेअरमनपदी पंकज राजीव पाटील तर व्हा.चेअरमनपदी अरुण सीताराम महाजन यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. आज मंगळवारी विशेष सभा बोलविण्यात आली होती. यात पंकज पाटील यांचा चेअरमनपदासाठी आणि अरुण महाजन यांचा व्हा.चेअरमन पदासाठी एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवडीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी एस.एफ.गायकवाड यांनी केले. यावेळी संजय वाणी, सूर्यभान चौधरी, ज्ञानेश्वर महाजन, सोपान पाटील, डॉ.राजेंद्र पाटील, शंकर राऊत, अॅड.जे.जी.पाटील, जर्नादन पाचपांडे, बिसन सपकाळ, प्रल्हाद महाजन, अॅड.प्रवीण पाचपोहे, व्यवस्थापक प्रकाश पाटील उपस्थित होते. निवडीनंतर आमदार शिरिष चौधरी, बाजार समिती सभापती श्रीकांत महाजन, पदमाकर महाजन, हरीष गनवाणी, तुकाराम बोरवले, उमेश महाजन, राजीव पाटील आदींनी नवनिर्वाचित चेअरमन, व्हा.चेअरमन यांचा सत्कार केला
.