रावेर पिपल्स बँक अध्यक्षपदी ज्ञानेश्‍वर महाजन

0

रावेर : रावेर पिपल्स को.ऑपरेटिव्ह सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्‍वर महाजन तर उपाध्यक्षपदी बिसन सपकाळ यांनी बिनविरोध निवड झाली. रावेर पिपल्स बँकेच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाची विशेष सभा निवडणूक निर्णय अधिकारी आर.एस. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी झाली. यात पिपल्स बँकेच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्‍वर महाजन तर उपाध्यक्षपदी बिसन सपकाळ यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी भोसले
यांनी केली.

संस्थेच्या सर्वांगिण विकासावर भर देणार
यावेळी संचालक प्रल्हाद महाजन, अ‍ॅड. प्रविण पाचपोहे, संजय वाणी, डॉ. राजेंद्र पाटील, शंकर राऊत, पंकज पाटील, शोभा वाणी, एस.आर. चौधरी, अशोक महाजन, व्यवस्थापक प्रकाश पाटील आदी उपस्थित होते. निवड प्रक्रियेसाठी सहकार अधिकारी पी.डी. पाटील, सी.एस. राणे यांनी सहकार्य केले. नवनिर्वाचित अध्यक्ष ज्ञानेश्‍वर महाजन, उपाध्यक्ष बिसन सपकाळ यांचे नगराध्यक्ष दारा मोहम्मद, नगरसेवक अ‍ॅड. सुरज चौधरी, माजी नगरसेवक हरिष गणवाणी, कामगारनेते दिलीप कांबळे, सुनिल महाजन, कैलास वाणी यांनी अभिनंदन केले.रावेर पिपल्स बँकेच्या ग्राहकालाक आजच्या काळानुसार आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करुन देवू तसेच बँकेचा कारभार पारदर्शक करुन संस्थेच्या सर्वांगिण विकासावर भर देणार असल्याचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर महाजन यांनी सांगितले.