रावेर पोलिसांची गावठी दारू विक्रेत्यांविरुद्ध मोहिम : पाच जणांविरुद्ध गुन्हे

0

रावेर : रावेर पोलिसांनी तालुक्यातील खिरवड-नेहते परीसरात नाल्याकाठी सुरू असलेल्या अवैध दारू भट्ट्यांवर धाड टाकून सुमारे 42 हजार रुपयांचे रसायन नष्ट केले. रावेर पोलिस स्थानकात पाच जणांविरुध्द स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहे.

पाच आरोपींविरुद्ध गुन्हा
रावेरचे पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, सहा.पोलिस निरीक्षक शीतलकुमार नाईक यांनी सोमवारी पहाटे आपल्या पथकासह खिरवड शेत-शिवारात नाल्यालगत अवैध दारूच्या भट्टीवर छापा टाकत नऊ हजारांचे रसायन नष्ट केले. याप्रकरणी किरण धनु कोंगेविरुध्द गुन्हा दाखल केला. त्यानंतर जवळच असलेल्या अड्ड्यावर धाड टाकून 13 हजार पाचशे रुपयांचे अवैध दारूचे रसायन नष्ट करून प्रकाश किटकुल गाढे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला तसेच काही अंतरावर पुन्हा धाड टाकत 10 हजारांचे रसायन नष्ट केले व जनार्दन या इसमाविरुध्द गुन्हा दाखल केला. नेहता शिवारात धाड टाकून दोन हजार सातशे रुपये किंमतीचे रसायन नष्ट करण्यात येवून कैलास पाव्हणु तायडे याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला व नेहते शिवारात तीन हजार सहाशे रुपये किंमतीचे रसायन नष्ट करण्यात आले. संजय नामदेव तायडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचही आरोपी पसार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे. नाईक महेंद्र सुरवाडे, सुरेश मेढे, श्रीराम कांगणे, योगेश चौधरी, विशाल पाटील, मुकेश तडवी, महेश मोगरे आदींचा सहभाग होता.