रावेर बसस्थानकावर शाळकरी विद्यार्थिनीचा विनयभंग

School girl molested at Rawer Bus Stand रावेर : रावेर तालुक्यातील एका गावातील रहिवासी असलेल्या अल्पवयीन शाळकरी विद्यार्थिनीचा 45 वर्षीय आरोपीने अश्लील वर्तन करीत विनयभंग केल्याची घटना शुक्रवारी दुपारी 12 वाजता घडली. या प्रकरणी संशयीत आरोपी तुळशीदास गणेश करोसिया (रा.रामदेवबाबा नगर, सावदा) याच्या विरोधात विनयभंग व पोस्को कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

शाळकरी विद्यार्थिनीचा विनयभंग
रावेर तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन विद्यार्थिनी शिक्षणासाठी दरररोज रावेरात येते. विद्यार्थिनी मैत्रिणीसह घरी जाण्यासाठी शुक्रवारी दुपारी 12 वाजता बसस्थानकावर आल्यानंतर प्लॅटफार्म क्रमांक 9 वर बसली असताना संशयीत आरोपी तुळशीदास करोसिया याने विद्यार्थिनीसमोर अत्यंत अश्लील चाळे करीत तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करीत विनयभंग केला. या प्रकरणी पिडीतेने पालकांना ही बाब सांगितल्यानंतर पोलिसात धाव घेत आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक दीपाली पाटील करीत आहेत.