रावेर- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागातर्फे ईव्हीएम मशीनच्या जनजागृतीसाठी निवडणूक यंत्रणा कामाला लागली आहे. रविवारी प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले व तहसीलदार विजयकुमार ढगे यांच्या उपस्थितीत ठिकठिकाणी ईव्हीएम मशीन व व्हीव्ही पॅटबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी वापरण्यात येणार्या तसेच प्रशिक्षणासाठी घेण्यात घेतलेल्या ईव्हीएम व व्हव्हीपॅटची यादी मान्यताप्राप्त राष्ट्रीय व राज्यस्तरीय राजकीय पक्षांना देण्यात आली. याबाबतचे वेळापत्रकदेखील राजकीय पक्षांसाठी उपलब्ध करून देण्यात आले. रविवारी प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले, तहसीलदार विजय ढगे यांच्या उपस्थितीत कोचुर (ता.रावेर) येथे मतदारांना ईव्हीएम व व्हीव्हीपॅटचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. या प्रसंगी तलाठी शिरसाट, खवले, तेजस पाटील, भारत वानखेडे, कांबळे, मतदार तसेच सरपंच, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.