आमदार हरीभाऊ जावळेंच्या प्रयत्नांना यश ; ग्रामीण भागातील गावांचा होणार विकास
फैजपूर– आमदार हरीभाऊ जावळे यांच्या प्रयत्नांनी रावेर मतदार संघातील गावांतर्गत काँक्रिटीकरण व पेव्हरब्लॉक आदी कामे करण्यासाठी ग्रामविकास विभागांतर्गत दोन हजार 515 मुलभूत योजनेमधून दोन कोटींच्या निधीस मंजुरी देण्यात आलेली आहे. लवकरच या सर्व कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करून या कामांना सुरुवात करण्यात येणार आहे. मंजूर झालेल्या कामांमध्ये- सांगवी बु.॥ येथे चौकात पेव्हर ब्लॉकचे बांधकाम करणे, हंबर्डी येथे मुख्य चौकात पेव्हर ब्लॉकचे बांधकाम करणे, हिंगोणा, ता.यावल येथे चौकात पेव्हर ब्लॉकचे बांधकाम करणे, डोंगरकठोरा, ता.यावल येथे चौकात पेव्हर ब्लॉकचे बांधकाम करणे, सातोद, ता.यावल येथे मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे, वाघोड, ता.रावे येथे चौकात पेव्हर ब्लॉकचे बांधकाम करणे, कर्जोद, ता.रावेर येथे रस्त्याच्या दोन्ही बाजूस जोडणार्या रस्त्याचे डांबरीकरण करणे, रावेर ग्रामीणमध्ये काँक्रिटीकरण व गटार बांधकाम करणे, चिनावल, ता.रावेर येथे मुख्य चौकात पेव्हर ब्लॉकचे बांधकाम करणे, कुंभारखेडा, ता.रावेर येथे चौकात पेव्हर ब्लॉकचे बांधकाम करणे, निंभोरा बु.॥ ता.रावेर येथे मुख्य चौकात पेव्हर ब्लॉकचे बांधकाम करणे, खिरोदा प्र.यावल, ता.रावेर येथे गावांतर्गत काँक्रीटीकरण करणे, पाडळसे, ता.यावल येथे मुख्य चौकात पेव्हर ब्लॉकचे बांधकाम करणे, अहिरवाडी, ता.रावेर येथे चौकात पेव्हर ब्लॉकचे बांधकाम करणे, बामणोद, ता.यावल येथे स्वामीनारायण गल्लीत पेव्हर ब्लॉकचे बांधकाम करणे, भालोद, ता.यावल गावांतर्गत काँक्रिटीकरण करणे, उटखेडा, ता.रावेर येथे चौकात पेव्हर ब्लॉकचे बांधकाम करणे, केर्हाळे बु.॥, ता.रावेर गावांतर्गत काँक्रिटीकरण करणे, खानापूर, ता.रावेर गावांतर्गत काँक्रिटीकरण करणे आदी कामे होणार आहेत.