माजी विधानसभा अध्यक्ष अरुण भाई गुजराथी यांचे प्रतिपादन
चोपडा – गेल्या दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा उपस्थितीत बैठक घेण्यात आली होती. राज्यातील ४८ जागा पैकी ४० जागेचा तिढा सुटलेला आहे. उर्वरित ८ जागांचा तिढा अद्याप सुटलेला नाही. जळगाव जिल्यातील रावेर लोकसभा मदारसंघासाठी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी व भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी ही दोनच नावे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा समोर आहेत. तिसरे नाव अजून तरी समोर आले नसून पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मला रावेर मतदार संघासाठी निवडणुक लढविण्यासाठी सागितले, तर मी त्यांचा शब्द हा कायदा मानतो म्हणून निवडणुक लढविण्यासाठी तयार आहे. राज्यासह रावेर मतदार संघात मी लोकांसमोर नवीन चेहरा नाही परंतु माझा पेक्षा दुसरा कोणी सरस उमेदवार मिळाला तर त्यांना उमेदवारी राहील असे माजी विधानसभा अध्यक्ष अरुण भाई गुजराथी यांनी जनशक्तीशी बोलताना सांगितले.
खासदार खडसे यांचे मतदार संघाकडे दुर्लक्ष केल्याची टिका
भाजपाचे खासदार रक्षाताई खडसे यांना गेल्या २०१४च्या लोकसभा निवडणुकीत चोपडा तालुक्याने ७७ हजाराचे सर्वाधिक लीड दिले होते ५०वर्षाचा कालावधीत एवढा लीड कोणत्याही उमेदवाराला मिळालेला नव्हता. खासदार रक्षाताई खडसे यांनी तालुक्याच्या जास्तीत जास्त विकास कामांना प्राधान्य दिले पाहिजे होते, अशी खंत अरुण भाई गुजराथी यांनी व्यक्त केली. म्हणाले की भारतभर भाजपाने गेल्या २०१४ चा लोकसभा निवडणुकीत जो जाहीरनामा प्रसिद्ध केला होता आता २०१९ आले असून जाहीरनामा पैकी १०ते १५टक्के देखील विकास कामे झाली नाहीत तीच परिस्थिती चोपडा तालुक्याची आहे लोकांना भाजपाकडून ज्या काही अपेक्षा होत्या त्या देखील पूर्ण करण्या संर्दभात भाजप कमी पडली ही वस्तूस्थिती आहे मतदार सघा मधील एखादे गाव दत्तक घ्यायचे ही बाब किरकोळ असुन हा विकास नाही
पाण्याचा संर्दभात फार काही मोठे काम करू शकले नाही. रावेर मतदार संघातील सर्व तालुक्यामध्ये पाणी अडवा पाणी जिरवा असे काही मोठे प्रकल्प राबविले गेले नाहीत तसेच त्यात काही अडचणी पण असतात मी हे मान्य करतो मात्र रावेर मतदार संघाला सातपुडा पर्वताचे वैभव लाभलेले आहे. या सातपुड्याच्या सव्हेसाठी यूपीए व एनडीएचे सरकार असेल त्यांनी निधी देखील उपलब्ध करून दिला होता. परंतु तरी देखील ते काम पूर्ण करु शकले नाहीत. कृषी व इरिगेशन संर्दभात पाहिजे त्या प्रमाणे विकास कामे झाली नाही असे माजी विधानसभा अध्यक्ष अरुण भाई गुजराथी सागितले.