रावेर मर्चन्टस् को-ऑफ क्रेडीट सोसायटीच्या संचालकपदी विजय मनवाणी

0

रावेर- शहरातील दि रावेर मर्चन्टस् को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. संस्थेच्या तज्ज्ञ संचालकपदी प्रतिष्ठीत व्यापारी व सिंधी समाजाचे अध्यक्ष तथा रावेर गो शाळेचे खजिनदार विजय मुरलीधर मनवाणी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. संस्थेच्या मासिक बैठकीत संचालक अ‍ॅड.प्रवीण पाचपोहे यांनी मनवाणी यांना तज्ञ संचालक घेण्याचा प्रस्ताव सभेसमोर ठेवला याला सर्वानी अनुमती दिली. यावेळी संस्थाध्यक्ष संजय गंगाधर वाणी, संचालक सुरेश गणपत वाणी, निलेश भास्कर पाटील, यशवंत वासुदेव दलाल, रमेश मुरलीधर रायपूरकर, संतोष रामकृष्ण पाटील, वसंत लहानु पाटील, देवानंद प्रल्हाद गजरे, ज्योती दिनकर वाणी आदींची उपस्थिती होती. कामकाज मुख्य कार्यकारी अधिकारी विलास कांतीलाल वाणी यांनी पाहिजे.