रावेर महसूल प्रशासनाने अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले

रावेर : अवैधरीत्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टरसह ट्रॉली विटवा गावानजीक रावेरातील महसूल पथकाने जप्त केल्याने अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणार्‍यांच्या गोटात खळबळ उडाली आहे. ऐनपूर परीसरात मोठ्या प्रमाणात अवैध गौण खनिज वाहतूक होत असल्याची ओरड असताना धडक मोहिम राबवण्याची अपेक्षा आहे.

कारवाईने उडाली खळबळ
अवैधरीत्या वाळू वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनत चालला असून विटवे गावानजीक वाळूने भरलेले ट्रक्ॅटर-ट्रॉली निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाधिकारी जी.एन.शेलकर, निंबोल कोतवाल विनोद अटकाळे पकडल्याने खळबळ उडाली आहे.