रावेर : गतवर्षी शंभर टक्के वसुली करणारा रावेर महसूल विभाग यंदा वसुलीत मागे पडला आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिलेल्या उद्दिष्टांपैकी आतापर्यंत फक्त 51.62 टक्केच वसूली झाली आहे. आधीच शासनाच्या तिजोरीत ठणठण असतांना रावेर महसूलची फक्त पन्नास टक्केच वसूली चिंतेचा विषय ठरला आहे.
गतवर्षी शंभर टक्के झाली वसुली
रावेर महसूल विभागाने मागील वर्षी शंभर टक्के वसूली केली होती.व जिल्हाभरात प्रसिध्दी मिळवली होती. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी 2021 साठी दहा कोटींचे उद्दिष्ट रावेर महसूल विभागाला दिले आहे. 12 मार्चपर्यंत रावेर महसूलने चार कोटी 51 लाख 70 हजार म्हणजे 51:62 टक्के वसुली केली आहे. 31 मार्च पर्यंत शंभर टक्के वसूल करण्याचे आव्हान महसूल विभागापुढे आहे.