रावेर माध्यमिक शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी प्रा.सी.एस.पाटील

0

रावेर- रावेर तालुका माध्यमिक शिक्षक-कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा.सी.एस.पाटील यांची तर उपाध्यक्षपदी विनीता राणे यांची बिनविरोध निवड झाली. संस्थेच्या अध्यक्षा देवयानी पाटील व हैदर अली यांनी राजीनामे दिल्याने रिक्त झालेल्या या दोन्ही पदासाठी संस्थेच्या कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी एफ.आय. तडवी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा बोलविण्यात आली होती.

बिनविरोध निवडीनंतर पदाधिकार्‍यांचा गौरव
यावेळी अध्यक्षपदासाठी प्रा.सी.एस.पाटील तर उपाध्यक्षपदासाठी विनीीता राणे यांचे प्रत्येकी एक अर्ज आल्याने अध्यक्षपदी प्रा.पाटील यांची तर उपाध्यक्षपदी विनिता राणे यांची निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. याकामी निवडणूक निर्णय अधिकारी यांना सचिव भागवत पाटील यांनी सहकार्य केले. निवडीनंतर संस्थेचे संचालक तसेच माजी मुख्याध्यापक पी.आर.पाटील, जे.के.पाटील, ललित चौधरी, दिलीप कांबळे, कृष्णा पाटील, अशोक शिंदे, राजू खिरवडकर, जगदीश घेटे, दिलीप लहासे, योगेश गजरे, राजू महाजन, प्रशांत पाटील, दत्ता पाटील यांच्यासह अनेकांनी नूतन पदाधिकार्‍यांचा गौरव केला.